गीताधर्म – संदेश

अखिल विश्वाला मार्गदर्शक आणि भारतीय तत्वज्ञानाचे सार असा ‘श्रीमद् भगवद्गीता ‘ हा ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्ण आणि वीरश्रेष्ठ अर्जुन यांच्यातला हा संवाद ४००० वर्षे उलटून गेली तरी आजच्या काळातील दिशादर्शक असा आहे. श्री व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथात भीष्मपर्वात. प्रकट झालेल्या या ग्रंथाची जन्मतिथी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी – गीताजयंती आहे.

श्रीमद् भगवद्गीतेवर अनेकोनेक विद्वानांनी भाष्ये लिहिली. त्यापैकी लोकमान्य टिळकांनी कर्मयोग प्रधान असा अर्थ ‘गीतारहस्य’ ग्रंथात मांडला. गीताधर्म मंडळ याच गीताधर्माचा, गेली ९५ वर्षे प्रसार करते आहे.

कसलाही मोबदला न स्वीकारता, फलाची अपेक्षा न करता निरलसपणे कार्य करण्याचा संदेश देणारा गीताधर्म हा राष्ट्रधर्म आहे. राष्ट्र उभारणीचे आणि उद्याच्या वैभवशाली देश बनवण्याचे काम, हे आपण सर्व गीताधर्मीयांना करावयाचे आहे. ‘ काही वेळ समाजासाठी’ प्रत्येकाने द्यायचा ठरवलं तर, ही स्वप्नपूर्ती फार दूर नाही.

Leave a comment