अधिक मास गीता पाठ

गीता संथा वर्ग

अधिक मास गीता पाठ
शुक्रवार दि. १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२० असा अधिक अश्विन मास आहे. यावेळी कोरोना साथीमुळे अधिक मासामध्ये पूर्वीप्रमाणे एकत्रित गीतापाठांचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तथापि आपाण सर्वजण पुढे दिल्याप्रमाणे गीतापाठ करू या.

(१) अधिक मास शुक्रवार दि. १८ सप्टेंबर ते शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२० या कालावधीत आहे.
(२) सर्व शिक्षकांनी आपापल्या माजी छात्र यांना त्यांच्या आपापल्या घरी गीतापाठ करण्यास प्रोत्साहित करावे आणि याबाबत आपापल्या माजी छात्रांच्या संपर्कात रहावे, ही विनंती.
(३) आपणा सर्वांचे एकत्रित उद्दिष्ट या महिन्यात किमान ५१००० (एक्कावन्न हजार) गीतापाठ करण्याचे आहे.
(४) प्रत्येक माजी छात्र याने दररोज किमान सहा अध्याय म्हटले तर तीन दिवसात त्याचा एक गीता पाठ आणि महिन्यात दहा गीतापाठ होतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन दिवसात एक गीता पाठ (रोज ९ अध्याय) किंवा रोज एक, याप्रमाणे गीतापाठ करावेत. (चक्री गीतापाठाची नोंद यामध्ये करू नये.
(५) प्रत्येक शिक्षकाने मासाअखेर त्यांचेकडील सर्व छात्र यांची माहिती (छात्राचे नाव, फोन नं., पाठांची संख्या) कागदावर एकत्रित लिहून मंडळाचे ऑफिसमार्फत किंवा समक्ष प्रा. कोंढवेकर यांचेकडे द्यावी. या सर्व याद्यांचे एकत्रित रजिस्टर तयार करण्यात येईल.
(६) सर्व शिक्षकांनी आतापासूनच आपल्या छात्रांना सूचना द्याव्यात.
(७) आपण सर्वजण मिळून आपले किमान ५१००० गीता पाठांचे उद्दिष्ट पार करू या आणि उच्चांक प्रस्थापित करू या. आपण सगळे मिळून हे नक्कीच करू शकतो.

भगवंतांची सेवा समजून आपण हा कार्यक्रम यशस्वी करू या.

अधिकस्य अधिकं फलम् ||

प्रा. मुकुंद कोंढवेकर
समन्वयक
गीता संथा वर्ग समिती
गीताधर्म मंडळ, पुणे.

2 Comments

  • Snehaprabha Khole
    Posted सप्टेंबर 11, 2020 4:52 pm 0Likes

    I want to join in your group for reciting Geeta as I already recite 18 chapters daily for Ashok mas

    • Asmita Ghate
      Posted सप्टेंबर 13, 2020 10:44 am 0Likes

      Please connect with Kondhwekar Sir (09422320116) and he will guide you please.

Leave a comment