नाव : श्रीमद् भगवद्गीता, (योगेश्वर श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेली)
जन्मतिथी : मार्गशीर्ष शुद्ध एकादशी (गीताजयंती)
जन्मकाळ : आजच्या पूर्वी चार हजार वर्षे (इ.स.पूर्व १९३९)
योग्यता : भारतवर्षातील प्राचीन ब्रह्मविद्येचे नवनीत
महत्त्व : सकल हिंदूधर्मीयांचा सर्वमान्य ग्रंथ
स्वरूप : अध्याय अठरा, एकूण श्लोक संख्या सातशे
श्लोक छंद : अनुष्टुभ छंद, चार चरण, प्रत्येक चरणात आठ अक्षरे
प्रथम प्रकट : श्री व्यासकृत महाभारत ग्रंथात, भीष्मपर्वात
रचनाबंध : उपनिषदीय पध्दतीचा, गुरु – शिष्य संवादात्मक
गुरु – शिष्य : योगेश्वर श्रीकृष्ण, वीरश्रेष्ठ अर्जुन
गीतारहस्य : निष्काम म्हणजे आसक्तिरहित कर्मयोग
प्रेरक महापुरुष : लोकमान्य टिळक
गीता संदेश : ऐहिक प्रगती आणि पारमार्थिक समाधान दोन्ही मिळवावयाचे
भारतातील सर्व देशी भाषांतील पहिले भाष्य : श्री ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)
वर्तमानकालीन सर्वोत्कृष्ट अनुवाद : आचार्य विनोबाकृत गीताई