आजपर्यंतचा गीताधर्म मंडळाचा एकूण कार्यसंभार, सूत्ररूपाने नोंदवायचा तर तो असा आहे.
१) ९४ वर्षांची ‘गीताधर्मा’च्या प्रचाराची आणि प्रसाराची निरलस जनसेवा –
२) ‘गीतादर्शन’ या आध्यात्मिक – सांस्कृतिक मासिकाची ४९ वर्षांची अविरत वाटचाल.
३) तिसाव्या म्हणजे रौप्यमहोत्सवानंतरच्या वर्षातही चालू असलेले, दैनंदिन अखंड ज्ञानसत्र (व्याख्याने/प्रवचने/कीर्तने सादर) तसेच वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमाला. उदा. सकल
संत अध्यासन, बाळशास्त्री हरिदास स्मृति गौरव इत्यादी
४) ‘गीताव्रती (सन १९८९ पासून) ‘ज्ञानेश्वरी प्रबोध’ (सन १९९६ पासून) आणि ‘श्री तुकोबाराय गाथा प्रवेश’ (सन २००० पासून) यांचा पत्रद्वारा परीक्षा विभाग.
५) वैशिष्ट्यपूर्ण गीता-संथा-वर्गाची, १९९४ पासून सुरू असलेली, विनाशुल्क अशी, पुणे परिसरातील वर्धिष्णू साखळी (आज ९५ ठिकाणी गीतासंथा वर्ग चालतात)
६) विशेष ग्रंथ-प्रकाशन विभाग (आजपर्यंत पंन्नासहून अधिक निवडक प्रकाशने प्रसिध्द, त्यात ‘विविधागीता’ हा प्रकल्प )
७) श्रीगीताभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असे नलिनी वसंत भिडे समृध्द संदर्भ-ग्रंथालय – त्यात भारतीय – संस्कृती अध्ययन केंद्र आणि
८) याशिवाय अनेक लोकहितकारी उपक्रम. उदा. दरवर्षी संपूर्ण गीताकंठस्थ स्पर्धा/अध्यायवार पाठांतर स्पर्धा तसेच उन्हाळी-हिवाळी संस्कारवर्ग/ गीता पाठशाला वर्ग /संस्कृत व्याकरण वर्ग इत्यादी.
गीताधर्म मंडळाच्या वास्तूंसंबंधी इतिहास, सद्यःस्थिती आणि संकल्प यासंबंधी माहिती नोंदवायची तर – २३ जुलै १९२४ ला मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून गीतावाचस्पती सदाशिवशास्त्री भिडे यांच्या, सदाशिव पेठेतील भाडयाच्या जागेत काही वर्षे, मंडळाचे कार्य चालत असे. शास्त्रीबुवांच्या निधनानंतर (१९४०) खालकर तालीम चौकातील गोडबोले वाडयातील तिसऱ्या मजल्यावरील सुमारे २०० चौरस फूट जागेत, मंडळाचे कार्यालय सन १९७० पर्यंत स्थिरावले होते. पुढे सन १९७० यावर्षी मंडळाने सदाशिव पेठेतील मध्यवस्तीतील, १० हजार चौरस फुटांची वास्तू (म्हणजे ११४१, भिडेवाडा, सदाशिव पेठ) खरेदी केली. पुढे काही वर्षांनी या वास्तूच्या १/३ भागात नव्याने बांधकाम पूर्ण झाले.
त्यानंतर उत्तरोत्तर मंडळाची अधिक प्रगती होत गेली. पुढे एकूण ‘गीताभवना’च्या संकल्पित भव्य वास्तूपैकी संपूर्ण दर्शनी भाग म्हणजे निम्मे बांधकाम, इ.स. २००५ मध्ये पूर्ण झाले. त्यात चार व्यवसायिक गाळे आणि प्रत्येकी १७०० चौरस फुटांची अशी तीन प्रशस्त सभागृहे आहेत. त्यात मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी, सोयी-सुविधा उपलब्ध, झाल्या आहेत. मंडळाच्या उत्तरेकडच्या प्रशस्त प्रांगणात, भव्य असे ‘योगेश्वर सभागृह’ उभारण्याचा, मंडळाचा संकल्प आहे. त्यासाठी गीताप्रेमींकडून उदार देणगीची नम्र अपेक्षा आहे.. गीताधर्म मंडळाला, आर्थिक देणग्यांच्या संदर्भात, आयकरातील ८० जी या कलमान्वये कायमची करसवलत मिळालेली आहे.